शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 27, 2017 00:45 IST

नगरपरिषद व महानगरपलिका येथील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी....

मागण्यांची पूर्तता करावी : ४ महिन्यांचे वेतन थकीतचंद्रपूर : नगरपरिषद व महानगरपलिका येथील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रहार कामगार संघटनेच्या वतिने विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल चिपळुणकर यांच्या मार्गदर्शनात जटपूरा गेट येथे बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भर उन्हात धरणे आंदोलन करण्यात आले. मागील १५ वर्षापासून नगरपरिषद व महानगरपलिका येथील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांना लागू करण्यात आलेल्या किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच भविष्य निधी, राज्य कर्मचारी विमा व इतर कल्याणकारी योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या कामगारांचे मासिक वेतनही वेळेवर देण्यात येत नाही. प्रशासनाने कामगारांना तीन ते चार महिन्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ३ दिवसांच्या आत वेतन देण्याची मागणी विदर्भ प्रहार कामगार संघटनेकडून धरणे आंदोलनातून करण्यात आली आहे. चंद्रपुरात ४५ ते ४६ अंश तापमान असूनसुद्धा विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल चिपळुणकर व कंत्राटी कामगार जटपूरा गेट येथे आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)या आहेत मागण्याथकित वेतन तीन दिवसांच्या आत द्यावे, कंत्राटदारांने बेकायदेशिररित्या कामावरुन बंद केलेल्या कर्मचारी व कामगारांना तीन दिवसांच्या आत पूर्ववत कामावर घ्यावे, किमान वेतन कायद्याप्रमाणे आजपर्यंतच्या वेतनाच्या फरकाची रक्कम बॅकेत सात दिवसाच्या आत जमा करावी, सर्व कामगारांची आजपर्यंतची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा सात दिवसाच्या आत जमा करावी, कर्मचारी विमा योजनेतंर्गत सर्व कामगारांचे पंजीयन त्याच्या नियुक्तीपासून व्हावे, व त्याां ई.एस.आय चे कॉर्ड देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्याचे वेतन बॅकेमार्फत मिळावे, शासनाच्या किमान वेतन, पी.एफ.ई.एस.आय व ईतर कायद्याचे तंतोतंत पालन कंत्राटदाराने करावे, कामगार कायद्याचे पालन होते की नाही, याकडे साहायक कामगार आयुक्त व चंद्रपूर मनपा आयुक्तांने लक्ष द्यावे, कर वसूली कर्मचाऱ्यांना वसूल पाणी कर भरणा केल्याची रक्क मेच्या नोंदीसह पोचपावती कंत्राटदाराने द्यावी आदी मागण्याचा समावेश आहे.