शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 20, 2014 23:26 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले. आता शेतकरी दमदार पावसाची वाट बघत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. शेतातील विहिरीचे पाणी देवून पऱ्हे मोठे केले. दरम्यान जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. तीन नक्षत्रे कोरडी गेल्यावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पऱ्ह्यांना फायदा झाला. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर पंप सिंचन व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. पण जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहे. त्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत रोवणी केलेली नाही. फक्त पऱ्हे जगविण्याचे काम सुरू आहे. पावसाअभावी धानपीक खरीप हंगाम धोक्यात आला असून आता दमदार पावसाची गरज आहे.या तालुक्यातील तलाव, बोड्या, शेततळे अद्यापही कोरडेच असून नदी-नाल्यांना पाणी नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनापासून मुकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात ४० टक्क्यापेक्षा कमी रोवणीची कामे झाली आहे. ६० टक्के शेतकऱ्यांची रोवणी झालेली नाहीत. सिंदेवाही तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत. येथील गडमौशी तलाव पाहिजे त्या प्रमाणात भरलेले नाही. त्यामुळे ३०० हेक्टरवरील धान पऱ्हे रोवणीच्या प्रतिक्षेत आहेत. रोवणी झाली म्हणजे पिके हाती येत नाहीत. त्याला पावसाची गरज आहे. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. त्यात सिंदेवाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे. सिंदेवाही तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)