शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मलनिस्सारणाचे भिजत धोंगडे

By admin | Updated: May 8, 2014 01:44 IST

कोणतीही महत्त्वाकांक्षी योजना असो, महानगरपालिकेच्या अंदाधुंद कारभारामुळे त्या योजनेचे वाटोळेच होताना आजवर दिसत आले.

काम ठप्प : ७0 कोटींची योजना १00 कोटींच्या पारकोणतीही महत्त्वाकांक्षी योजना असो, महानगरपालिकेच्या अंदाधुंद कारभारामुळे त्या योजनेचे वाटोळेच होताना आजवर दिसत आले. नगराचे सुंदर व स्वच्छ महानगरात रुपांतर करणारी भूमिगत मलनिस्सारण योजनाही त्याचेच द्योतक ठरत आहे. २0११ मध्ये पूर्ण होणार्‍या या योजनेचे काम २0१४ पर्यंत निम्म्यावरही पोहचू शकले नाही. आता बिल पास केले नाही, या सबबीखाली तब्बल चार महिन्यांपासून या योजनेचे कामच बंद करण्यात आले आहे.चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर अनेक नवीन योजना प्रस्तावित आहेत. मात्र आजवर एकही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही. २४ ऑगस्ट २00९ मध्ये भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २00९ मध्येच वर्क ऑर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २0११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २0११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आले. मात्र २0१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २0१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २0१४ उजाडले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम अर्धेही झालेले नाही. या योजनेत ये काम करण्यात आले. त्याचाही खेळखंडोबाच झालेला आहे. रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चंद्रपूरच्या दौर्‍यावर आले असताना तेदेखील नदीपात्रात प्लॅन्ट पाहून थक्क झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर अधिकार्‍यांना यावरून चांगलेच धारेवर धरले होते.या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लॅन्ट पठाणपुरा परिसरात आहे. मात्र त्याचेही बरेच काम शिल्लक आहे. याशिवाय ट्रीटमेंट प्लॅन्टपर्यंत पाईप लाईनही अद्याप टाकण्यात आलेली नाही. अनेक वॉर्डात पाईप लाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. दरम्यान शिवास्वाती कंपनीने झालेल्या कामाचे एक कोटीचे बिल काढले. आयुक्तांनी ते मंजूरही केले. मात्र कामे थातूरमातूर असल्याचे कारण सांगत सत्ताधारी पक्षानेच कंत्राटदारांना बिल देण्यास विरोध दर्शविला. याबाबत चौकशीही बसविण्यात आली. मागील चार महिन्यांपासून चौकशीही पूर्ण झालेली नाही. बिल दिले नाही म्हणून कंत्राटदारानेही काम बंद ठेवले आहे. दीड महिन्यात पावसाळ्याला प्रारंभ होईल, हे येथे उल्लेखनीय.