शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

धानोरकरांनी अधिकाऱ्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:52 IST

मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता विविध कामांचे २६३ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आले. त्यात १५ टक्के प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्ताव एक वर्षांचा कालावधी लोटूनही मंजूर झाला नाही.

ठळक मुद्देपाणी टंचाई आढावा बैठक : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता विविध कामांचे २६३ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आले. त्यात १५ टक्के प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्ताव एक वर्षांचा कालावधी लोटूनही मंजूर झाला नाही. त्यामुळे टेमुर्डा येथे आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार बाळू धानोरकर चांगलेच संतप्त झाले. या आढावा बैठकीत त्यांनी उपस्थित अधिकाºयांना चांगलेच खडेबोल सुनावले.वरोरा तालुक्यातील सन २०१८-१९ च्या पाणीटंचाई आढावा सभा टेमुर्डा येथील ग्रामपंचायत भवनात पार पडली. यावेळी आमदार बाळू धानोरकर, पं. स. सभापती रोहिणी देवतळे, पं. स. उपसभापती विजय आत्राम, जि. प. सदस्य सुनंदा जीवतोडे, पं. स. सदस्य नारायण कारेकार, बाजार समिती सभापती विशाल बदखल, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिलींद भोयर, उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे आदी उपस्थित होते. मागील बैठकीचे इतिवृत्त मागील वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, पाईपलाईन दुरुस्ती, विंधन विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, नळयोजना विशेष दुरुस्ती आदी कामांचे २६३ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यात ३४ प्रस्ताव वर्षभरात मंजूर झाले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जे प्रस्ताव पाठविले. त्याचा पाठपुरावा केला नाही.लोकप्रतिनिधींना वर्षभरात माहिती दिली नाही. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेला विशेष निधी मिळाला नाही व अनेक कामे प्रलंबित राहिली. मागील वर्षातील कामे मार्गी लागली नाही तर या वर्षाची सभा घेताच कशाला, असा संतप्त सवाल सभेत आमदार धानोरकर यांनी उपस्थित करून यामध्ये दोषी अधिकाºयांवर कारवाई होणार असल्याचेही संकेत दिले.मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे बैठकउमरी ग्रामपंचायत पाईपलाईन निकृष्ट, करंजी नळ योजना, शेंबळ येथील पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून काम अपूर्ण आहे. या सर्व योजना मार्गी लावाव्यात. याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी यावेळी दिले. टेमुर्डाचे सरपंच मारोती झाडे, तहसीलदार सचिन गोसावी, पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता हेडाऊ, बाजार समितीचे संचालक देवानंद मोरे, माजी उपसभापती भोजराज झाडे, संवर्ग विकास अधिकारी संजय बोदीले, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी बोबडे उपस्थित होते.