शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यातील धानपिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:31 IST

तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : तीव्र उन्हामुळे पिके कोमेजली

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्र्णा : तालुक्यामध्ये तब्बल एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आणि सततच्या तीव्र उन्हामुळे धान पीक करपायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकºयांची धानपीके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकºयांचे बहरलेले पीक पुन्हा संकटात सापडले आहे़यावर्षी धानपिकांच्या पºहे टाकवणीनंतर पाऊस उशीरा पडल्याने धानपिकांची रोवणी उशीरा करण्यात आली. त्यामुळे पीक ज्या स्थितीमध्ये पाहिजे, त्या स्थितीत नाही़ तरीही शेतकºयांनी हिंमत न सोडता शेतीची कामे सुरू ठेवली आहे.परंतु तब्बल एक महिन्यांपासून कडक ऊन तापत असल्याने याचा परिणाम मध्यम प्रतिच्या धान पिकांवर जास्त होत असून सदर धानपिक निसावण्याच्या उंबरठ्यावर आले आहे़ त्यातच उन्हाच्या दाहकतेने काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.किटकनाशक औषधांचा पुरवठा करावास्थानिक परिसरातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे व उत्पादीत खर्चानुसार भाव मिळत नसल्याने हतबल होवून कर्जबाजारी झाला आहे़ खासगी कृषी केंद्रातून महागडी औषधी घेऊन फ वारणी करणे त्यांच्यासाठी परवडणारे नाही. त्यामुळे अनेक गरीब शेतकरी औषधी घेऊन फ वारणी करू शकत नाही.पर्यायाने त्यांना पाहिजे तसे उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक स्तरावरुन मोफ त औषधी देण्याची मागणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतकºयांकडून करण्यात येऊ लागली आहे.