शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

संघरामगिरीवर अवतरणार धम्मबांधवांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:10 IST

सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील धम्मबांधवांचे जत्थे संघभूमीत दाखल होत होते. गुरुवारच्या समरोपीय कार्यक्रमाकरिता लाखो धम्मबांधव संघरामगिरीला दाखल होणार असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देआज मुख्य कार्यक्रम : बौद्ध अनुयायांच्या स्वागतासाठी साधनाभूमी सज्ज

आशीष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील धम्मबांधवांचे जत्थे संघभूमीत दाखल होत होते. गुरुवारच्या समरोपीय कार्यक्रमाकरिता लाखो धम्मबांधव संघरामगिरीला दाखल होणार असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्राम लढवून समाजाला समतेचा सूर्य दाखविला. याच दिनाच्या स्मरणार्थ व महामानवाच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीला करून देण्यासाठी व महामानवाला अभिवादन करण्यासाठी मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघभूमीत पहाडीवर दोन दिवसीय धम्म समारंभाचे आयोजन केले जाते.मागील आठवडाभरापासून या अखंड सुत्तपठण या संघभूमीत सुरू असून द्विवसीय समारंभाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी सुरू असून गुरुवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाकरिता लाखोंच्यावर धम्मबांधव धम्म समारोहात समाविष्ट होऊन महामानवाला अभिवादन करून एक नवी ऊर्जा घेऊन जातात. गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित राहणार आहेत.संगीतमय कार्यक्रमाचे आयोजनधम्म समारोहासाठी विविध भागातून उपस्थित असणाऱ्या धम्माबांधवांकरिता परिसरातील गावात सामाजिक प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघरामगिरीला येणाऱ्या लाखो अनुयायांना आयोजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पहाडावरील मुख्य कार्यक्रमस्थळी २४ तास पिण्याचे पाणी व भोजनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.सफाईकरिता स्वयंसेवकदोन दिवस संघभूमीत विविध कार्यक्रम असतात. त्यामुळे या ठिकाणी समता सैनिक दल व परिसरातील विविध सामाजिक संघटनाकडून परिसरात स्वच्छता करण्यात येत असून आयोजकांकडून अस्थायी स्वरूपाची शौचालय व स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. संघभूमीत येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी विविध वैद्यकीय संघटनाही घेतली असून २४ तास सेवा पूरविण्याकरिता कार्यक्रम स्थळावर तंबू उभरण्यात आले आहेत.