शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर आजपासून धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:42 IST

येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांची जय्यत तयारी करणे सुरू होते. ही तयारी सायंकाळी अंतिम टप्प्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांची जय्यत तयारी करणे सुरू होते. ही तयारी सायंकाळी अंतिम टप्प्यात आली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला १५ आॅक्टोबरला सायंकाळी ४ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, महाथेरो भदंत ज्ञानज्योती महास्थवीर उपस्थित राहतील. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, उपस्थित राहतील.