शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ताडोब्यात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ताडोबा देवाच्या पूजा-अर्चेसाठी व देवदर्शनासाठी भाविकांना ताडोबा प्रशासनाने खुटवंडा ...

ठळक मुद्देखुटवंडा गेटवर दिवसभर भाविकांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ताडोबा देवाच्या पूजा-अर्चेसाठी व देवदर्शनासाठी भाविकांना ताडोबा प्रशासनाने खुटवंडा गेटवरच रोखल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. ताडोबा प्रशासनाने अभयारण्यात प्रवेश करण्यास नकार दिल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत भाविकांनी गेटसमोर धरणे दिले. देवदर्शनासाठी परवानगी न दिल्यास रात्रभर गेटसमोर ठिय्या देण्याचा पावित्रा भाविकांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे. धरणे देणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व मुलांचा समावेश होता.दरवर्षी पौष महिण्यात ताडोबा परिसरात असणारे गावकरी प्रत्येक रविवारी ताडोबा देवाच्या दर्शनासाठी जातात. मात्र ताडोबा प्रशासनाने या पूजेला व दर्शनाला आडकाठी केल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या. गेल्या वर्षी गावकऱ्यांनी धरणे दिल्याने त्यांचा रोष पाहून ताडोबा प्रशासनाने गावकऱ्यांना देवदर्शन घेऊ दिले होते. यावर्षी गावकऱ्यांनी ताडोबा प्रशासनाला माधव जीवतोडे व सुधीर मुडेवार यांच्या नेतृत्वात एका निवेदनाद्वारे यावर्षी ताडोबा प्रशासनाला ताडोबा देवाचे दर्शन घेण्याची रितसर सूचना दिली होती. मात्र प्रशासनाने त्यांची विंनती धुडकावून खुटवंडा गेटजवळ पोलीस बंदोबस्त मागितला व विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. रविवारी सकाळपासून परिसरातील दहा ते बारा गावातील शेकडो गावकरी गेटवर गोळा झाले. मात्र संध्याकाळपर्यंत या भाविकांना वनविभागाने प्रवेश दिला नाही. त्यानंतर चिडून भाविकांनी दिवसभर गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. उशिरापर्यंत प्रवेश न दिल्यास रात्रभर गेटसमोर ठिय्या देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. धरणे आंदोलनात सुधीर मुडेवार, माधव जीवतोडे, सुधार रंदये, शंकर भरडे, देविदास लाखे, शेख सलाम, नयन जांभुळे, सुमित मुडेवार, पार्वताबाई जीवतोडे, स्रेहल मुडेवार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.