शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांना झाले ताडोबा देवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:59 IST

पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली.

ठळक मुद्देआदिवासींच्या श्रद्धेसमोर नमले प्रशासन : शासकीय वाहनातूनच प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली. यंदा आठ गावातील आदिवासी व इतर बांधवांनी ताडोबा देवाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. त्यानुसार शेकडो बांधव दर्शनासाठी निघाले असता त्यांना अडविण्यात आले. मात्र वनविभागाचे अधिकारी व गावकºयांच्या दीर्घ चर्चेनंतर अखेर शासकीय वाहनाद्वारे त्यांना दर्शनार्थ वनविभागाने स्वत:च नेले.ताडोबा शेजारील चंदनखेडा, वडेगाव, कोंडेगाव, काटवल, खुटवडा, घोसरी, वायगाव, पिर्ली या आठ गावातील आदिवासी तसेच इतर ग्रामस्थांनी ताडोबा देवाचे दर्शन घेऊ द्यावे, या संदर्भात वनविभागाला निवेदन दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता सर्व गावातील भाविक खुटवंडा-काटेझरी या प्रवेशद्वाराजवळ आले. नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार व माधव जीवतोडे यांनी केले. या जंगलाला व्याघ्र प्रकल्प घोषित केल्यामुळे या प्रकल्पात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या वाहनाने किंवा पायदळ प्रवेश करण्यास बंदी केली आहे. ग्रामस्थ रविवारी येणार म्हणून वनविभागाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ताडोबा देव हे आमचे श्रद्धास्थान असल्याने आमचे पूर्वज त्याची पूजा-अर्चा करीत पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी कोंबडे व बकºयाचा बळी देत होते. मात्र वनविभागाने या प्रथेच मज्जाव घातला. मात्र यावेळी समाजातील कार्यकर्ते सुधीर मुडेवार व माधव जीवतोडे यांच्या पुढाकाराने दर्शन घेण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी शेकडो भाविक एकत्र जमा झाले. या ठिकाणी त्यांना अडविण्यात आले. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी, उपवनसंरक्षक कुलकर्णी आणि खुपसे, विभागीय वनाधिकारी किशोर मानकर, मोहुर्लीचे क्षेत्र सहायक राजूरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी गावकºयांना आपल्या वाहनांनी ताडोबा देवाचे दर्शन घडविले. यावेळी दंगा नियंत्रक पथकाच्या तीन गाड्यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. एसडीपीओ प्रताप पवार गर्दीवर नियंत्रण ठेवून होते.