शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बाप्पाच्या स्थापनेसाठी भक्तांची लगबग

By admin | Updated: September 17, 2015 00:47 IST

शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, ...

चंद्रपूर : शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, यासाठी प्रशासनही सज्ज झाला आहे. पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी मंगळवारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, यासाठी गणेश मंडळानी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. पोलीस मुख्यालय येथे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, विज विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, मनपाचे उपायुक्त विजय इंगोले, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस निरिक्षक सिरसकर व शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.नियम हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी असतात, त्यामुळे नियमांचे पालन झालेच पाहिजे. वर्गणी ही वर्गणी असावी, जबरदस्ती नसावी, सार्वजनिक गणेश स्थापना करताना विविध परवानग्या घेऊनच स्थापना करावी, असे पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकगणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील. दीडशे पोलीस अधिकारी राहणार तैणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची खबरदारी बाळगली जाणार आहे.दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहनराज्यातील काही भागात भीषण दुष्काळ असून गणेश मंडळांनी आपल्या काही खर्चात कपात करता आली तर ती जरूर करावी व हा निधी राज्याच्या दुष्काळी भागाला द्यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी गणेश मंडळांना केले. दुष्काळी भागाला मदत करणे समाज म्हणून आपल दायित्व आहे. गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवून अनावश्यक खर्च न करता तो पैसा दुष्काळग्रस्तांना द्यावा व आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.रस्त्यावर मंडप उभारणाऱ्यांवर कारवाईगणेश मंडळाना लागणाऱ्या विविध परवानग्या मनपा, वीज विभाग, परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने दिल्या जातात. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणीही रस्त्यावर मंडप उभारु नये, जितक्या जागेची परवानगी असेल तितक्याच जागेवर मंडप उभारला जावा, वाहतुकीला अडथळा होता कामा नये, पीओपीच्या मूर्ती बसवू नये, परवानगी घेऊनच वीज वापरावी, निर्माल्य हे मनपाने ठेवलेल्या कलशातच टाकावे, मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी परिवहन विभागाकडून करून घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना गणेश मंडळांच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.