शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालात ब्रह्मपुरीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील विकास सीताराम परतानी हा वाणिज्य शाखेचा (इंग्रजी माध्यम) विद्यार्थी ९५. ८३ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला. त्यापाठोपाठ वरोरा येथील दिशा ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेची मृणाल उमेश लाभे ही ९५. ६७ टक्के गुण घेत द्वितीय आली. तर नेवजाबाई हितकारिणी ज्यु. कॉलेजची सलोनी पिलारे ही ९१.५० टक्के घेऊन तिसरी आली आहे.   यंदाच्या निकालात चंद्रपूर तालुका  (९७. ८३ टक्के) अव्वल ठरला, तर सिंदेवाही तालुका (९२.५५ टक्के) पिछाडीवर गेला. नागपूर विभागातील निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार १४५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २७ हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण दोन हजार ९७६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. १० हजार ६२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १२ हजार १०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून बारावीच्या निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा विदर्भात पाचव्या क्रमांकावर होता. (तालुकानिहाय निकाल पान २ वर)

वाणिज्य शाखा       ९४. ६६ टक्केवाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.६६ आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाणिज्य शाखेचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला आहे.

कला शाखा ९३. ६७ टक्केकला शाखेतून एकूण १३ हजार १४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ९३.६७ आहे. कला शाखेसाठी १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढले. गतवर्षी कोरोनामुळे १६ टक्के परीक्षेला बसले नव्हते. गतवर्षी निकाल ५ टक्क्यांनी कमी होता.

एमसीव्हीसी     ९६.१७ टक्के एमसीव्हीसी (व्होकेशनल) अभ्यास शाखेतून एक हजार ४९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ९६.१७ इतकी आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडीजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते जिवती, गोंडपिपरी, कोरपना, सावली, मूल, नागभीड, पोंभुर्णा या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल