शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

येत्या दहा महिन्यात जिवती कोरपन्याचा होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:42 IST

जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे. पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पंचायत समितीला मिळाली नवी इमारत

आॅनलाईन लोकमतकोरपना : जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे. पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृती आराखडा तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.कोरपना पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अ‍ॅड. संजय धोटे उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, गोदावरी केंद्रे, उपविभागीय अधिकारी क्रांती कोंबे, तहसीलदार हरीश गाडे, पं.स. सभापती श्यामबाबू रणदिवे, उपसभापती संभाजी कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, कल्पना पेचे, विना मालेकर, पं.स. सदस्य सिंधू आस्वले, रुपाली तोडासे, नूतन जीवने, महेश देवकते, संवर्ग विकास अधिकारी संदीप घोन्सीकर आदी उपस्थित होते.पिंपळगाव येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील पंचायत समितीच्या सर्व माजी सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी २०१६-१७ मध्ये तालुका स्मार्ट ग्राम कुकुडसात व यावर्षी २०१७-१८ मध्ये तालुका स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबी येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक सहायक संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी संदीप घोन्सीकर यांनी केले.