शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

चंद्रपूरला बनविणार विकासाचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:50 IST

पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : इरई नदीवर साकारणार ६५ कोटींचा केबल स्टेड पूल

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात. आता साबरमतीच्या धर्तीवर इरई नदीच्या घाटाचा विकास आपण करणार आहोत. इरई नदीवर मुंबईतील सी-लिंगसारखा पूल पुढील दीड वर्षात तयार होणार आहे. पाचवेळा निवडून देणाऱ्या जिल्हावासीयांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. नागरिकांचे आशीर्वाद कार्य करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला सर्व क्षेत्रात विकासाचे मॉडेल बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.इरई नदीच्या काठावर हजारो लोकांच्या उपस्थितीत बुधवारी ना. मुनगंटीवार यांनी नव्या व जुन्या चंद्रपूरला जोडणाºया ६५ कोटी १९ लाख रुपयांच्या दाताळा पुलाचे भूमीपुजन केले. यावेळी ते बोलत होते. चौपदरी असणाऱ्या या पुलामुळे चंद्रपूरच्या वैभवात भर पडणार असून इरई नदीला कितीही मोठा पूर आला तरी जुन्या व नव्या शहराचा संपर्क तुटणार नाही, अशी उंची या पुलाला मिळत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नवीन चंद्रपूर विकसित होण्यासाठी गती येणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, वरोराचे आमदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, म्हाडाचे संचालक संजय भिमनवार, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, सभापती अनुराधा हजारे उपस्थित होते.यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आजच्या भूमिपूजनाने पूर्ण होत आहे, असे स्पष्ट केले. यासाठी म्हाडाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून त्यापैकी ६५.१९ कोटी रुपयामध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. तर उर्वरित निधीमध्ये इरई नदीच्या घाटाचा विकास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.बसस्थानकेही होणार सुसज्जचंद्रपूर येथील बसस्थानकाचे २६ जानेवारीला भूमिपूजन केले जाणार आहे. जिल्हयातील अन्य बसस्थानकांच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूरमधील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी २५७ कोटींची योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील शाळांना ३५८ खोल्या आगामी काळात बांधून देण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये शाळेतील खोल्यांचे बाधकाम पूर्ण झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव पुढे येईल, असे स्पष्ट केले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देखणी इमारत केवळ वास्तू म्हणून नव्हे तर रोजगाराची संधी देणारे नवीन केंद्र म्हणून ओळखले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटावाचंद्रपूर जिल्हयात विकास व्हावा, यासाठी सत्तेत नसताना प्रचंड संघर्ष केला आहे. आज जेव्हा सत्ता आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वाद पाठीशी असताना महाराष्ट्रातील सर्व आघाडयांवर विकसित जिल्हा म्हणून काम करण्याचा सपाटा गेल्या तीन वर्षात सुरु केला असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रापासून राज्यातील अन्य भागातील लोकांना हेवा वाटावा, अशा वेगळया पध्दतीचा विकास व त्यातून रोजगारांची संधी देण्यासाठी आपली धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.