शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कलेतून अध्यापनाची दृष्टी विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:11 IST

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करण्यासाठी कलागुणांचाही उत्तमरित्या वापर करता येऊ शकते.

ठळक मुद्देपी. आर. पाटील : जिल्हास्तरीय कला विषयक कृतिसत्र

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करण्यासाठी कलागुणांचाही उत्तमरित्या वापर करता येऊ शकते. त्यासाठी शिक्षकांनी अध्यापनातून ही दृष्टी विकसीत करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या प्संयुक्त विद्यमाने स्थानिक एफईएस गर्ल्स हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या एक दिवसीय जिल्हास्तरीय कला विषयाचे कला अभ्यासक्रम व मुल्यमापन कार्यपद्धती कृतिसत्रात ते बोलत होते. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी कृतिसत्राचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका हंसा गिरडकर, विषयतज्ज्ञ मोहन भोजापूरे, विभागीय सहकार्यवाहक सुदर्शन बारापात्रे, प्रशांत नवघरे, भोयर, माजी अध्यक्ष एम. एम. अली, पी. व्ही. पाटील, किरण पराते, सचिव कार्तिक नंदूरकर आदी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात पी. आर. पाटील म्हणाले, शिक्षकांना अध्यापनात येणाºया अडचणीवर मात करुन नवनव्या कला आत्मसात केले पाहिजे. संघटीत होऊन समस्यांचे निराकरण सहजपणे करता येते. कला विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतली पाहिजे. विषयतज्ज्ञ व प्रमुख वक्ते मोहन भोजापूरे यांनी कला वियषाच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. कला विषयातील सर्व बारकाव्यानिशी विषयाचे सादरीकरण करून शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी या संवाद उत्साहाने सहभाग घेतला होता. भद्रावती येथील ग्रामोद्योग संघाचे गाडेकर व नरोत्तमदास यांनी माती कला आणि संगीत शिक्षक नासीरकर यांनी संगीत विषयाचे प्रात्याक्षिक सादर करुन शिक्षकांच्या ज्ञानात भर घातली. मुख्याध्यापिका हंसा गिरडकर यांनी कला विषयक अध्यापनातील उपयोजनेचे महत्त्व प्रतिपादीत केले. विभागीय सहकार्यवाह सुदर्शन बारापात्रे व सल्लागार प्रशांत नवघरे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन संजय अंड्रस्कर व ज्योती बावणे यांनी केले.