हंसराज अहीर : युवा महोत्सव साजराचंद्रपूर : राज्यात होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पु.बा. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि सन्मित्र हिंदू मिशन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे वार्षिक युवा महोत्सवा प्रसंगी ना. अहीर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लाखो होमिओपॅथी प्रॅक्टीशनर देशातील ग्रामीण व शहरी क्षेत्रात वैद्यकीय सुविधा प्रदान करीत असून अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ प्राप्त होत आहे, असेही त्या स्पष्ट केले. त्यांनी होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या समस्यांबाबत शासनाला अवगत करण्याचे व त्यात सुधारणा करण्याकरिता लवकरच दिल्लीला अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी सन्मित्र मंडळाचे आश्रयदाये डॉ. गो. वा. अंदनकर, मंडळाचे सचिव अॅड. नीलेश चोरे, डॉ. शिवप्रसाद भुसारी, कोषाध्यक्ष नानाजी आग्रे, दत्ता मसादे, प्राचार्य डॉ. सु.य. साखरकर व एल.म.सी. सदस्य डॉ. के.बी. गौरकार, डॉ. उमेश माद्येसवार, डॉ. सुचिता वैद्य, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल चौधरी, विद्यापीठ प्रतिनिधी कविता भंडारी मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी ना. अहीर यांच्या हस्ते डॉ. गो.वा. अंदनकर यांना ‘आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. होमिओपॅथिक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या अनुदानाचा गंभीर प्रश्न व शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मंत्री महोदयाकडे मागणी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी रमेश काळे व राजू पोंगडे यांचाही सत्कार ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अभिजित सोनवणे व अमरिन खान यांनी केले. (प्रतिनिधी)
होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा विकास व्हावा
By admin | Updated: March 25, 2017 00:50 IST