महाराष्ट्र शासनाला जाग येईना : तेलंगण शासनाचे वर्चस्व कायम जिवती : आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या शंकरलोधी येथील (जंगुदेवी) कपलाई देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असून विविध राज्यातील व जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र शासनाने या देवस्थानाला ‘क’ दर्जाच तिर्थक्षेत्रही घोषित केले. मात्र असे असताना देखील तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम करून आपले वर्चस्व गाजवित असून मंदिर ताब्यात घेते की, काय अशी शंका वर्तवली जात आहे जिवती तालुक्यापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर शंकरलोधी हे गाव आहे. गावानजीक असलेल्या घनदाट जंगलात विस्तीर्ण गुंफा व सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा अंथाग डोह आहे. अशा घनदाट ठिकाणी असलेल्या देवस्थानात अदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी विविध कार्यक्रमही होतात. येथे येणाऱ्या भाविकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजगुडा ते शंकरलोधी हा कच्चा रस्ता तयार केला व मंदिराचे बांधकाम करून अर्धवट सोडून दिले होते. दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत जाणारी भाविकांची संख्या पाहता, आपली दादागिरी दाखवित तेलंगणा शासनाने महाराष्ट्र शासनाने अर्धवट सोडलेले मंदिराचे बांधकाम पूर्ण केले व मंदिरापासून १०० मिटर अंतरावर सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत हे देवस्थान असतानाही तेलंगणा शासनाने मंदिर व रस्त्याचे काम केले, हे महाराष्ट्र सरकारला दिसले नाही काय, त्यांच्यावर कार्यवाही का केली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकार ही बाब खपवून का घेते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशीच दादागिरी चालवित तेलंगणा शासन या अदिवासीच्या देवस्थानाचा ताबा तर घेणार नाही ना, असे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)शासनाने लक्ष द्यावेजिवती तालुक्यात निर्सगरम्य माणिकगड किल्ला आहे. अदिवासीचे श्रध्दास्थान असलेली शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान, मराईपाटणची मराईदेवी, पुरातन विष्णू मंदिर आणि अमलनाला येथील विलोभनीय तलाव, अशी अनेक ठिकाणे भाविकांना व पर्यटकांना मोहीत करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाने या बाबीकडे लक्ष देवून साकारात्मक पाऊल उचलले तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या बरोबरीचे हे ठिकाण ठरू शकेल.आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान शंकरलोधी येथील जंगुदेवी कपलाई देवस्थान हे आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान मानले जाते. याच मंदिरालगत उंच टेकडीवर चार ते पाच फुटाची कोरलेली खोली असून या खोलीतच शिवलिंगाची पिंड आहे. या शिवलिंगाच्या पिंडाला कान पकडून दोन्ही हाताने उचल्यास आपल्यावरील संकटे दूर होत असल्याचा नागरिकांचा समज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली गावे गेल्या अनेक वषार्पासून सीमावादात अडकलेली आहे. या गावात महाराष्ट्र शासन विकास कामे गांभीर्याने घेतली नाही. याच बाबीचा फायदा घेत तेलंगणा शासन विकास कामे करण्यावर मोठे भर देत आहे.
देवस्थान महाराष्ट्राचे अन् निधी तेलंगणकडून
By admin | Updated: September 7, 2016 00:51 IST