शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

सपत्निक देहदानाचा निर्धार

By admin | Updated: September 2, 2016 01:03 IST

मृत्यू हा अटळ असून तो एक दिवस येणारच आहे. समाजातील गरजूंना देहाचा उपयोग झाला,

नेत्रदान आधीच : मूल येथील शिक्षकाचा पुढाकारराजू गेडाम मूलमृत्यू हा अटळ असून तो एक दिवस येणारच आहे. समाजातील गरजूंना देहाचा उपयोग झाला, तर नवीन जगण्याची इच्छा जागृत होईल. देहदानानंतर इतरांना मिळणारे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मूल येथील शिक्षक प्रशांत मधुकर गटलेवार व त्यांच्या पत्नी रंजना प्रशांत गटलेवार यांनी देहदानाचा निर्धार केला आहे. यापूर्वी त्यांनी नेत्रदानही केले आहे. मात्र नेत्रदान करताना शासकीय यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य न मिळाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याने आता त्यांनी थेट राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल येथील कार्यालयात लेखी पत्र देऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. देहदानाचा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन उचलेले गटलेवार दाम्पत्यांचे पाऊल प्रेरणा देणारे आहे.मूल येथील वॉर्ड नं. १७ मधील रहिवासी प्रशांत गटलेवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोमनाथ प्रकल्प, मूल येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतरही सामाजिक क्षेत्रात ते सतत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन करून शासनाच्या उद्देशाला समर्थन देण्याचा व वाढणाऱ्या लोकसंख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला. नेत्रदान करण्याच्या प्रक्रियेसाठी सतत भटकण्याची पाळी आली ही पाळीसुद्धा देहदानाच्या वेळी येऊ नये, यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल येथील कार्यालयात रिसतर पत्र देऊन शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मृत्यूनंतर इतरांना सुख देता यावे. समाजात त्यांना नवीन विश्व बघता यावे, यासाठी गटलेवार दाम्पत्यांनी देहदानाचे उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. ते इतरांना प्रेरणादायी ठरले व वंचित घटकांना त्याचा फायदा होईल,हेच या देहदानातून अभिप्रेत आहे.नेत्रदान करताना अनुभव वाईटमागील वर्षीच्या काळात त्यांंनी नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न केला.रीतसर प्रक्रिया पूर्ण केली. मात्र नेत्रदान करण्यासाठी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात. प्रत्यक्षात शासकीय यंत्रणा निस्तेज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.