शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

१४ व्या वित्त आयोगाचा निधी असूनही थकीत देयकांचा ताळमेळ जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

चंद्रपूर : ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीतील पथदिवे व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देयके थकीत असल्याने महावितरणने नोटिसा बजावल्या. दरम्यान, ...

चंद्रपूर : ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीतील पथदिवे व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देयके थकीत असल्याने महावितरणने नोटिसा बजावल्या. दरम्यान, १४ व्या वित्त आयोगातून खर्चाची तरतूद झाली; मात्र देयकांचा ताळमेळ जुळत नसल्याने सरपंच व ग्रामसेवक पेचात सापडले आहेत. जिल्हा समितीच्या अभ्यास अहवालाला बराच कालावधी लागणार असल्याने अनेक गावांना अंधारात दिवस ढकलावे लागणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीतील पथदिव्यांसोबतच ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही सुरू आहेत. या प्रकल्पांचे कोट्यवधींचे वीज देयक थकीत आहे. महावितरण देयक वसुलीसंदर्भात नोटिसा बजावल्यानंतर शासनाने १४ व्या वित्त आयोगातून हा खर्च करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र महावितरणने दर्शविलेल्या थकबाकीमध्ये ग्रामपंचायतींशिवाय इतर कार्यालये, खासगी व्यक्ती व संस्था इत्यादींच्या थकीत देयकांचा समावेश असल्याचे पुढे आले. परिणामी, ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी किती याबाबत सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. थकबाकीपोटी १४ व्या वित्त आयोगातून तसेच नियमित अनुदानातून अदा केल्या जाणाऱ्या रकमा कशाप्रकारे संबंधित ग्रामपंचायतींच्या थकीत देयकांमध्ये समायोजित केल्या, हाही प्रश्न पुढे आला. असा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात घडल्याने शासनाने थकबाकीचा ताळमेळ जुळविण्यासाठी ग्रामविकास व पंचायत विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अशाच प्रकारची जिल्हा समितीही गठीत करण्याच्या सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. निधी उपलब्ध आहे; मात्र समितीचा अहवाल येईपर्यंत सुमारे ३५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या वीज देयकांचा तिढा कायम राहणार आहे.

बॉक्स

अशी आहे त्रिसदस्यीय समिती

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्यपदी महावितरणचे अधीक्षक अभियंता (विद्युत) व सदस्य सचिवपदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांचा समावेश आहे. नगरपंचायत व नगरपालिका स्तरावर जिल्हा प्रशासन अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

बॉक्स

समिती काय तपासणार?

यापूर्वी पथदिवे, पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकांचा भरणा कुठून करण्यात आला, ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिकांचे स्वत:शिवाय अन्य मीटरचा तपशील, महावितरणने थकबाकी दर्शविलेल्या बिलांचा ताळमेळ ग्रामपंचायत व महावितरणकडून प्राप्त करून त्याचा तपशील राज्य समितीला सादर करेल. निधी उपलब्ध आहे; मात्र या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे.