शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुखाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विनोद बुटले नामक तक्रारकर्त्याने ‘लोकमत’ला पाठविलेल्या पत्रातून केला आहे.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याचे लोकमतला पत्र : साठेबाजांसोबत सोनटक्के नामक अधिकाऱ्याचे मधूर संबंध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुगंधित तंबाखू साठेबाजांनी काळ्याजाबारात इतकी उंची का गाठली, याचे बिंग ‘लोकमत’ने ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून फोडताच जिल्ह्यातील विविध कोपऱ्यातून अन्न व औषध पुरवठा विभागाबाबत तक्रारकर्ते नागरिक आता खुलेआम बोलायला लागले आहे. असेच एक पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. या पत्रानुसार सदर व्यक्तीचे स्वत: अन्न व औषध पुरवठा विभागाचे सहआयुत्तांना सुगंधित तंबाखूच्या साठ्याबाबत माहिती दिली. जो विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुखाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विनोद बुटले नामक तक्रारकर्त्याने ‘लोकमत’ला पाठविलेल्या पत्रातून केला आहे.जिल्ह्यातील सुगंधित तंबाखूचा काळाबाजार नेमका कुणामुळे चालतो, या दृष्टीने हे पत्र बरेच काही सांगून जाते. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर या साठेबाजांची आपला धंदा पूर्ववत सुरू राहावा, यासाठी धडपड सुरू झालेली आहे. ज्या धंद्याला प्रतिबंध आहे. तरीही हा धंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यादेखत सुरू होता. लॉकडाऊन झाले. शासनाने संचारबंदीचे आदेश बजावल्यापासून अन्य एकही व्यावसायिक आपले प्रतिष्ठान उघडत नव्हते हे वास्तव आहे. प्रशासनाच्या एकेका निर्देशाची ही मंडळी इमाने-इतबारे वाट बघत होते. त्यांना आपल्या कुटुंबाचे पोटपाणी असतानाही या व्यावयायिकांनी दुकाने प्रामाणिकपणे बंद ठेवली. तंबाखूची दुकानदारी शासनाने लॉकडाऊनपूर्वीपासूनच बंद केली आहे. तरीही ही मंडळी एखाद्या विभागाच्या कोणी सोनटक्के नामक अधिकाºयामुळे आपला धंदा राजरोसपणे चालवित असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. इचकेच नव्हे, तर ‘लोकमत’ला आलेल्या असंख्य फोनमध्ये सोनटक्के नावाच्या अधिकाºयाचे तंबाखू साठेबाजांसोबत मधूर संबध असल्याचे सांगितले जात आहे. हा अधिकारी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशापेक्षा मोठा आहे का? असा सवाल यामाध्यमातून उपस्थित केला जात आहे. एखादा अधिकारी, अधिनस्त अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर शासकीय कामात गडबड केल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागते. एखादा विभाग कर्तव्य बजावण्यास असमर्थ असेल त्या विभागाचे प्रमुख अधिकारीही जबाबदार ठरतो, अशी अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी