शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पात्र असूनही वृद्ध महिला घरकुल योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:52 IST

सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : मुसळधार पावसामुळे घर कोसळण्याचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कपेंढरी (कोके) : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. मुसळधार पावसात त्यांचे घर कोसळल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तुत प्रतिनीधीने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, त्यांचे मातीचे व कुळाचे घर दोन्ही बाजुने खचले आहे. भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. मात्र पर्याय नसल्याने त्या अजुनही आपल्या कुटुंबासह पडक्या घरातच राहतात. पावसाळ्यात घर पडले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना इजा झाल्यास कोण जबाबदार असे कुटुंबीयांनी सांगितले.बऱ्याच वर्षापासून आपण घरकुलाची मागणी करीत आहे. परंतु, कोणीच माझ्या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मला अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.- मायाबाई शेंडे, पीडित.