शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शेतमाल नियमनमुक्तीमुळे वाढले विदर्भातील धानाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:25 IST

शेतमाल नियमनमुक्त धोरणानुसार शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विकण्याची मुभा आहे. यापूर्वी गंजी लावून धानाचे भाव पाडणाऱ्यांना सध्या तरी चाप लागल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कुठेही धान्य विकण्याची मुभा गंजी लावून भाव पाडणाऱ्यांना चाप

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : केंद्र शासनाने ‘शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार प्रचलन व सुविधा अध्यादेश २०२०’ हा अध्यादेश लागू करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या पणन संचालनालयाने १० ऑगस्ट २०२० रोजी शेतमाल नियमनमुक्त करण्याचा आदेश लागू करताच पहिल्याच आठवड्यात विदर्भातील शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल २५० ते ३०० रूपयांचा वाढीव दर मिळाला आहे. शेतमाल नियमनमुक्त धोरणानुसार शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विकण्याची मुभा आहे. यापूर्वी गंजी लावून धानाचे भाव पाडणाऱ्यांना सध्या तरी चाप लागल्याचे दिसून येत आहे.२०१४ मध्ये महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त केला होता. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने नियमनमुक्तीवर मोठी टिका झाली. केंद्र सरकारने याच धोरणाचे अनुसरून करून देशभरातील संपूर्ण शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्व राज्यांनी ‘शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार प्रचलन व सुविधा अध्यादेश २०२०’ हा अध्यादेश लागू करण्याचा आदेश दिला. याशिवाय शेतमाल नियमनमुक्ती धोरणाशी निगडीत आणखी दोन असे एकूण तीन अध्यादेश लागू केले. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजीव अग्रवाल यांचा आदेश धडकताच राज्याच्या कृषी पणन मंडळ संचालकांनी या धोरणाची अंमबजावणी सुरू केली. परिणामी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाचे प्रति क्विंटल दर जास्त मिळू लागला आहे. या अध्यादेशानुसार धान विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून बाजार शुल्क, उपकर किंवा राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमाच्या अधिन तसेच कोणत्याही इतर राज्य कायद्यानुसार शुल्क घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.श्रीराम धानाला २०० ते २५० रूपये दरवाढविदर्भात चार वर्षांपासून श्रीराम धान लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, पोंभुर्णा तालुक्यात यंद श्रीराम धान लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. नियमनमुक्ती धोरणा लागू होण्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या धानाला प्रति क्विंटल २२९८ रूपये दर होता. आता खुल्या बाजारात २४०० ते २५०० रूपये दर मिळू लागला. विदर्भात पिकणाऱ्या धानाच्या अन्य चार वाणांमध्येही असाच वाढीव दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.बाजार समित्यांचा विरोध, शेतकरी संघटनेचे समर्थनसरकारने सर्व प्रकारचा शेतमाल नियमनमुक्त केल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विरोध तर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. शेतमाल नियमनमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना कुठेही माल विकता येतो, असा दावा संघटनेने केला तर बाजार समित्यांचे अस्तित्व संकटात आल्याचा आरोप समित्यांकडून केला जात आहे.पैसे अडविल्यास हमी कोण घेणार?कृषी उत्पन्न बाजार समित्या कायद्याला बांधील आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर रक्कम देण्यास विलंब झाला तर समितीला कायद्यानुसार जबाबदार धरता येते. मात्र, व्यापाऱ्यांना नियम नसल्याने पैसे अडविल्यास हमी कोण घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे ही जबाबदारी दिल्याची अध्यादेशात तरतूद आहे. ही प्रक्रिया वेळकाढू असल्याचा कृषी अभ्यासकांचा आक्षेप आहे. परंतू यात तथ्य नसल्याचा दावा शेतमाल व्यावसायिक जीवन कोंतमवार यांनी केला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती