शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:44 IST

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकृषी समस्यांकडे वेधले लक्ष : जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीत शेतकरी व जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले. सत्ताबदल होऊनही शेतकरी संकटात आहे. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा हवेत विरली. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीचे दावे खोटे ठरत आहेत. जबरान जोतधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वयाच्या ६० वर्र्षांनंतरही शेतकरी शेतमजूर व असंघटीत कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेंशनचा कायदा केला नाही. त्यामुळे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. परंतु, कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. कर्जमाफीसाठी नको त्या जाचक अटी शेतकºयांवर लादण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांच्या आत्महत्या अजूनही सुरू आहेत. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास शेतकºयांचे कल्याण होईल. परंतु, या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले आहे. महाराष्ट्रातील हजारो जबरानजोत धारकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवले आहे. गैरआदिवासी जबरानजोत धारकांना तीन पिढ्यांची जाचक अट (७५ वर्ष) लावण्यात आली. ती त्वरित रद्द करून सर्वांना जमिनीचे पट्टे व सात- बारा देण्यात यावा, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे. शेतकºयांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, भूसंपादन कायदा २०१३ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करून बळजबरीने वसुल करणाºयांवर कायदेशिर कारवाई करावी, आदी आदी मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान, राज्य महासचिव नामदेव गावंडे, डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे, बाळकृष्ण दुमाने, मनोहर आदे, सुधीर खेवले, रामदास कामडी, भोजराज मैन्द यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली व मूल तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.