प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर अंतर्गत २८ गावे येत असून सध्या सर्व गावांमध्ये तापाची साथ आहे. या तापाच्या साथेत विविध आजारांसह डेंग्यूसारख्या भयंकर आजाराने परिसर ग्रासलेला आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून आरोग्य विभागाकडून यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, हे निदर्शनास येत आहे. बरेच लोक खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहेत तर शंकरपूर व परिसरातील काही रुग्ण ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणी खासगी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेत आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूरच्या वैद्यकीय अधिकारी भंडारी यांना विचारणा केली असता आमच्या आरोग्य केंद्रात डेंग्यूचा एकही रुग्ण नसून डेंग्यूचे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही गावात फवारणी केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
शंकरपूर व परिसरात डेंग्यूची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST