शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

राळापेठमध्ये डेंग्यूसदृश तापाचे थैमान

By admin | Updated: May 22, 2014 23:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूसदृश तापाने कहर केला आहे. त्यातच गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात या तापाचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मागील वीस

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूसदृश तापाने कहर केला आहे. त्यातच गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात या तापाचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मागील वीस दिवसांत गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ गावातील दोन रुग्णांचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. तापाने फणफणणार्‍या याच गावातील एका रुग्णाचा मंगळवारी रात्री चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटलमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील राळापेठ गावाला सध्या डेंग्यूसदृश तापाने ग्रासले आहे. मागील दीड महिन्यापासून या तापाची साथ गावात सुरु असल्याने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. राळापेठ गावातील पन्नासहून अधिक रुग्ण वीस दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. यापैकी बर्‍याच रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्याने अनेकांना चंद्रपूर व गडचिरोलीत रेफर करण्यात आले. यानंतरही राळापेठ गावातील आरोग्य स्थिती काही सुधारली नाही. उलट परिस्थिती वाढण्यावरच जोर असल्याने आरोग्य विभागही आता चक्रावले आहे. राळापेठ येथे मागील वीस दिवसात डेंग्यूसदृश तापाने गावातीलच दोघांचा मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वी विनोद तिमांडे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच राळापेठ गावातील एका बंगाली समुदायातील व्यक्तीचा याच साथीमुळे मृत्यू झाला होता. वरील दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही कळले नसून, यांच्या मृत्यूचे कारण संदिग्ध असल्याचे बोलले जात आहे. आरोग्याची ही बाब अजूनपर्यंत स्पष्ट झाली नसताना मंगळवारी रात्री राळापेठ गावातीलच पुन्हा एका रुग्णाचा उपचारादरम्यान चंद्रपुरात मृत्यू झाला. पत्रूजी भगवान ताजणे (५८) असे या रुग्णाचे नाव असून, मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती तापाने फणफणत होता. चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटलमध्ये ताजणे भरती होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची रुग्णालयातून सुट्टी झाली. दरम्यान, पत्रूजी ताजणेला डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ताजने रुग्णालयातून घरी आल्यानंतर परत त्याला ताप आल्याने पुन्हा तो रुग्णालयात भरती झाला. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा उपचादारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, राळापेठ येथील घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)