शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भिसी येथे प्रसाधनगृहाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

भिसी येथे प्रसाधनगृहाची मागणी भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अपर तालुक्याचे ठिकाण आहे; परंतु शहरात ...

भिसी येथे प्रसाधनगृहाची मागणी

भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अपर तालुक्याचे ठिकाण आहे; परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने व्यापारीवर्गाची व नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावातील नागरिकांना खुल्या जागेवरच लघुशंकेसाठी जावे लागते. भिसीत शनिवारी बाजार भरतो. बाजारासाठी १५-२० गावांतून नागरिक भिसीत येतात. बाजार चौकात कुठेच प्रसाधनगृह नसल्याने बाहेरील नागरिकांची गैरसोय होते. जिथे जागा मिळेल तिथे लघुशंका आटोपली जाते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

वडगावच्या नाल्या तुंबल्या

चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महानगरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातील नाल्या मात्र वाहत नाहीत. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नेहमी दुर्गंधी सुटलेली असते. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.

सॅनिटायझरची विक्री घटली

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे ६० टक्के सॅनिटायझरची विक्री घटली असल्याची माहिती आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरी करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.

पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला; परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र, बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.

दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाहीत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सायकल चालविण्याला नागरिकांची पसंती

चंद्रपूर : कोरोनानंतर काही तरुणांनी सायकल चालविण्याच्या पर्यायाला पसंती दिली आहे. सकाळी सायकलिंग करण्याकडे त्यांचा कल आहे. यासाठी नागपूररोड, मूलरोड, पठाणपुरा गेटबाहेरील परिसरात मोठ्या संख्येने युवक सायकलिंग करताना दिसत आहेत.

अंगणवाडी सेविकांना मानधन वेळेवर द्या

चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांना आधीच तुटपुंजे मानधन देण्यात येते. त्यातही अनियमित मानधन देण्यात येते. मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. मानधन वेळेवर देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अंगणवाडी सेविकांना वेळेवर मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे.