पोस्ट विभागाला पूर्वी विशेष असे महत्त्व होते. माहिती, मजकूर पोहोचविण्याचे एकमेव साधन म्हणून डाक विभागाची ओळख होती. मात्र, काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन, इंटरनेटसेवेस सोबतच मोबाइल क्रांती झाली. पोस्टामार्फत होणारे पत्र व्यवहार कमी झाले. परिणामी, प्रशासनाने या विभागाला बँकेचे स्वरूप देत, आर्थिक व्यवहार सुरू केले. पूर्वी पोस्ट विभागाने आवर्त ठेव एजन्सी महिलांना दिल्या. त्यांच्यामार्फत महिला मासिक आरडी गोळा करायच्या. यातून त्यांना कमिशन मिळत असल्याने, महिलांना स्वयंरोजगार मिळून महिलांचे सक्षमीकरण झाले होते. मात्र, पोस्ट विभागाने डिसेंबर, २००५ पासून महिलांना नव्याने आरडी एजन्सी देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो महिलांना इच्छा असूनही एजन्सी घेता येत नाही, त्यामुळे महिलांचा पुरता हिरमोड झाला आहे.
पोस्टाची आवर्त ठेव एजन्सी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST