शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी पुन्हा वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

शहरात सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. कोणी वातावरणाचा बदल म्हणत आहे, तर कोणी नेहमीच सर्दी, खोकला म्हणून दुखणे अंगावर काढत आहे. ताप असेल तर कोरोना संसर्ग असू शकतो. त्यामुळे कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे  नागरिक जराही सर्दी, खोकला आणि घसादुखी वाटली तर थेट  मेडिकलमध्ये जाऊन औषधी घेत आहे. परिणामी या दिवसामध्ये सर्दी, खोकल्याच्या औषधीची मागणी झपाट्याने वाढली आहे.‘कोरोना’च्या रुग्णाला घशाची खवखव, वारंवार शिंक येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. हा त्रास नेहमीचाच आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक त्वरित औषध घेऊन बरे होण्याच्या प्रयत्न करीत आहेत. काही जण तर सर्दी, खोकला होण्यापूवीच मेडिकलमध्ये जाऊन औषध घरी आणून ठेवत आहेत. परिणामी खोकल्याच्या औषधाची झपाट्याने मागणी वाढली आहे. 

शासकीय ओपीडी वाढली- मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर आता शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये गर्दी दिसू लागली आहे. - कोरोनाच्या संभाव्य भीतीमुळे नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत असून लवकर औषधोपचार घेऊन बरे होण्यावर भर देत आहे.

...तर करा कोरोना टेस्टशहरात सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. कोणी वातावरणाचा बदल म्हणत आहे, तर कोणी नेहमीच सर्दी, खोकला म्हणून दुखणे अंगावर काढत आहे. ताप असेल तर कोरोना संसर्ग असू शकतो. त्यामुळे कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

बदललेले वातावरण हेही कारणमागील काही दिवसात वातावरण सारखे बदलत आहे. कधी ढगाळी वातावरण तर कधी अचानक थंडी वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर याचा विपरीत परिणाम पडत आहे. लहान बालकांसह ज्येष्ठांची यामुळे प्रकृती बिघडत आहे.

दहापैकी आठ जण सर्दी-खोकल्याचे

मागील काही दिवसांमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. दिवसभरातील १० रुग्णांमध्ये सात ते आठ रुग्ण हे सर्दी, खोकल्याचेच येत आहेत. काही जण डाॅक्टरकडे न जाताच मेडिकलमध्ये येऊन सर्दी, खोकल्याचे औषध मागत आहे.-देवेंद्र हेपट, औषधी दुकानदार

सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे नागरिक सर्दी, खोकला झाला तर त्वरित औषध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या दिवसामध्ये सर्दी, खोकल्याच्या औषधाची मागणी वाढली आहे.- औषधी दुकानदार

 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या