शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विंजासन प्रभागातील समस्या सोडविण्याची मागणी

By admin | Updated: November 10, 2016 02:06 IST

शहरातील विंजासन प्रभाग हा समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी

भद्रावती : शहरातील विंजासन प्रभाग हा समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात याकरिता भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.विंजासन प्रभागांतर्गत येणारा नागमंदिर ते विंजासन हा रस्ता जागोजागी उखडला आहे. पारेलवार दूध डेअरीपासून बंगाली कॉलनीकडे जाणारा रस्त्याचे डांबरीकरण अनेक दिवसांपासून रखडले आहे. तसेच विंजासन-एकतानगर, कुंभारबोडी-विंजासन या मार्गावरही समस्या आहे. मंजूर झालेल्या नाल्याचे काँक्रीटीकरण, मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरण, सुरक्षानगरमधील रस्त्याच्या दुतर्फा पेवर्स ब्लॉक लावणे, भवानीमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, मंदिराचे सौंदर्यीकरण, २००१ पूर्वी असणाऱ्या झोपडपट्टीवासींना जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक हजारे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी विनोद जाधव यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात अशोक हजारे, सुनील नामोजवार, प्रशांत आखरे, प्रशांत कटलावार, निलेश जुनारकर, गजानन घुगल, महेश तराळे, आशिष पोटे, अविश मत्ते, विवेक राखुंडे आदींचा समावेश होता.