शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील राणी महालाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

By admin | Updated: April 12, 2015 00:49 IST

बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे.

बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे. या किल्ल्याचा काही भाग काळानुरुप ढासळला असला तरी काही वास्तू अजुनही चांगल्या स्थितीत आहेत. त्यात नदीच्या अगदी काठावरील राणी महाल आहे. मजबूत बांधणीचा हा महाल देखणा आहे. या महालाच्या गच्चीवर उभे राहून नदीकडील व चौफेर दृष्य न्याहाळता येते. वर्धा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोक महालाच्या याच गच्चीवर येतात. पुराच्या दिवसांत हा परिसर गजबजून जात असतो. इतर दिवशीही किल्ला बघणारे या राणी महालाच्या गच्चीवर जातातच. या महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी दोन बाजुंनी पायऱ्या आहेत. अरुंद असलेल्या या पायऱ्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. एक दोन ठिकाणी तर मोठे भगदाड पडले असून आतील भाग पोकळ आहे. या पायरीवरुन वर चढताना पोकळ झालेल्या भागात पाय जाणार तर नाही ना, अशी भीती निर्माण होते. पायरीचा भाग उघडा पडून असल्याने पावसाचे पाणी आत शिरुन पायरीचा भाग दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यामुळे पायरीचा भेगा पडलेला भाग दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक आहे. महाल आणि त्यावरील गच्ची मजबूत आहे. जीर्ण झालेल्या त्याच्या पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी इतिहास प्रेमींची आहे. किल्ल्यातील आतील भागातील कचरा साफ केल्यामुळे किल्ला बघणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे, हे विशेष ! त्यामुळे, किल्ल्यात उगविणारे गवत व इतर झाडे वेळोवेळी काढत राहणे आवश्यक आहे. काहीजण आपली नाव कोरुन महालाच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)