शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीच्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2016 01:16 IST

घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

इंग्रजकालीन वास्तू : निकृष्ट दर्जाचे बांधकाम तळोधी (बा.): घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप घोडाझरी लाभ क्षेत्रातील नागरिकांनी केला आहे. १९०५ मध्ये घोडाझरी तलावाची निर्मिती झाली असून त्याअंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविल्या जाते. मुख्य ठिकाणाहून हुमा वितरिका, तळोधी वितरिका, सावरगाव वितरिका, गिरगाव वितरिका, गडबोरी वितरिकाद्वारे पाणी वाटप केले जाते. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटच्या भेगा पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कालव्याची पार फुटलेली आहे. तर मध्यभागी अनेक ठिकाणी छिद्र पडलेले आहेत. तसेच मुख्य कालव्याचा उपसा न केल्यामुळे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाकडे लक्ष घालून पाणी वाटपामुळे दुरुस्ती करण्याची मागणी लाभधारकांनी केली आहे. (वार्ताहर) दरवर्षी या तलावाच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांची पार फूटते व सतत आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी-शेतमजुरांना संकटाला समोर जावे लागते. तरी पाणी वाटपाच्या पूर्वीच कालव्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी व लाभ धारकाला घोडाझरी पाण्याचा फायदा व्हावा अशी मागणी केली आहे. - खोजराम मस्कोल्हे, माजी सभापती, पंचायत समिती, नागभीड