सुविधा उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारामध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या बाजारामध्ये किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------
स्कूल बसेसची तपासणी करावी
चंद्रपूर : कोरोनामुळे शाळा बंद आहे. दरम्यान, २७ जानेवारीपासून पाचवीपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्कूल बस असून, या बसद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण केली जाणार आहे. यातील काही बसेस सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने या बसेसची तपासणी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
खासगी रुग्णालयात पार्किंगची वानवा
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने रुग्ण तसेच त्यांचे कुटुंबीय आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे अशा रुग्णालय प्रशासनावर कारवाई करून येथे पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षेविनाच सुरू आहे एटीएम
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम राबवा
वरोरा : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.
--------
सुविधा उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारामध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या बाजारामध्ये किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------
खासगी रुग्णालयात पार्किंगची वानवा
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने रुग्ण तसेच त्यांचे कुटुंबीय आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावतात. त्यामुळे या रुग्णालय प्रशासनावर कारवाई करून येथे पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.