मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा
चंद्रपूर: शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. महापलिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उघड्यावर पदार्थाची विक्री
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, राजुरा, बल्लारपूरसह घुग्घुस या शहरांमध्ये काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाचा विक्री केली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अन्न व औषध पुरवठा विभागाने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
कोरपना: तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.