शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळ सेवा सीएससी गव्हर्नन्स कंपनीकडे न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST

चंद्रपूर : जिल्हा तसेच तालुका स्तरावरील बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून द्यावयाच्या मनुष्यबळ सेवा सीएससी गव्हर्नन्स कंपनीकडे देण्यात येऊ नये, तसेच ...

चंद्रपूर : जिल्हा तसेच तालुका स्तरावरील बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून द्यावयाच्या मनुष्यबळ सेवा सीएससी गव्हर्नन्स कंपनीकडे देण्यात येऊ नये, तसेच प्रोग्रामर व डेटा एन्टी ऑपरेटर यांचे मानधन वाढविण्यात यावे, अशी मागणी प्रोग्रामर व डेटा एन्ट्री ऑपरेटरनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर घरकुल योजनेसाठी एक प्रोग्रामर व १४ डेटा एन्टी ऑपरेटरची मेमर्स सिनर्जीज सोल्युशन प्रा. लि., औरंगाबाद यांच्या मार्फत नेमणूक करण्यात आली. या बाह्य यंत्रणेकडूनच त्यांचे नियमित वेतन व भत्ते अदा करण्यात येतात. तसेच कामगार विमा, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी आदी सर्व लाभ देण्यात येतात. याशिवाय सणासुदीच्या काळामध्ये ॲडव्हान्स वेतनदेखील देण्यात येते; परंतु शासन स्तरावर सदर काम ई-गर्व्हनन्स इ. लि. कंपनीकडे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. या प्रक्रियेला प्रोग्रामर व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा विरोध आहे. याच वेळी त्या कंपनीकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला वेळेवर मिळत नाही व अतिरिक्त कामाचा बोजाही देण्यात येतो, असा आरोप निवेदनात करण्यात आला.

यामध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पाणी व स्वच्छता विभाग व इतरही अनेक विभागांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा विरोध पाहून सीएससी ई-गव्हर्नन्स कंपनीकडून कामे काढून घेतली आहेत. तुटपुंज्या वेतनात दैनंदिन खर्च भागविणे अडचणीचे जात आहे. त्यामुळे प्रोग्रामर व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना दरवर्षी १० टक्के वेतनवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात दीपाली जवळे, प्रणीत बोबाटे, पल्लवी पराते, नितीन वेलपूरवार, पंकज झुरे, स्वप्नील भगत, प्रफुल्ल करपे, सचिन बुराडे, अंगद गुंडले, महेश शेळके, मीनाक्षी क्षीरसागर, राजकुमार चंदनबावणे, सचिन भरासरकर, रोशन खणके, प्रकाश घडसे, राजेंद्र खोब्रागडे, गौरव सोरते आदींचा समावेश होता.