शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

होल्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण चंद्रपूर : शहरातील विविध चौकांमध्ये तसेच जागा मिळेल तिथे होल्डिंग लावल्या जात आहे. यावर महापालिका प्रशासनाचे ...

होल्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण

चंद्रपूर : शहरातील विविध चौकांमध्ये तसेच जागा मिळेल तिथे होल्डिंग लावल्या जात आहे. यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुतांश चौक यामुळे विद्रूप झाले आहेत. विशेष म्हणजे, होल्डिंग लावण्यासंदर्भात न्यायालयाचे कठोर नियम पाठावा लागते. मात्र याकडेही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.

रस्त्यावरील ती झाडे हटवावी

चंद्रपूर : येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच डांबरीकण केले जात आहे. मात्र क्लब ग्राऊंड परिसरामध्ये रस्त्याच्या अगदी मधातच मोठमोठे वृक्ष आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर वृक्ष हटवून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे.

माठ विक्रीमध्ये वाढ

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऊन सातत्याने वाढत आहे. त्यामुळे थंड पाणी पिण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. शहरातील काही चौकांमध्ये माठ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात माठ विक्रीसाठी आणले आहे.

बांधकामांना आला वेग

चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन होते की, काय अशी अवस्था आहे. त्यामुळे बहुतांश व्यावसायिक हातातील बांधकाम पूर्ण करण्याकडे लागले आहे.

स्टेडियमची त्वरित दुरुस्ती करावी

चंद्रपूर : येथील जिल्हा स्टेडियमची दुरुस्ती केली जात आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. येथील काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवावे

चंद्रपूर: नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील विविध रस्त्यांचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले जात नसल्याने अपघाताची शक्यता आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

कूलरची दुकाने सजली

चंद्रपूर : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिक कूलर तसेच एसी लावण्याकडे वळले आहे. अडगळीत ठेवलेले कूलर बाहेर निघाले असून मोठ्या प्रमाणात कूलरची दुकानेही लागली आहेत.

हाॅटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे

चंद्रपूर : कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. असे असले तरी शहरातील काही हाॅटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी केली जात आहे.

सिटीबस सुरू करावी

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा नाही. दाताळा तसेच पडोलीपर्यंत जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने सिटीबस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

कचरा संकलकांना सुविधा पुरवावी

चंद्रपूर : शहरातील प्रत्येक घराघरातून घंडीगाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून संकलकांना कोणत्याही सुविधा नसल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या संकलकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी केली जात आहे.

लाॅन व्यावसायिकांची चिंता वाढली

चंद्रपूर : कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे लग्नसमारंभावर निर्बंध आले आहे. परिणामी लाॅन संचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांनी ॲडव्हान्स पेंमेट वापस मागितला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.