शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव प्रभागातील नाल्या-रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:08 IST

वडगाव हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर देणाºया प्रभागापैकी आहे. मात्र या प्रभागातील मोठा भाग अजूनही मूलभूत सुविधापांसून वंचित आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वडगाव हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर देणाºया प्रभागापैकी आहे. मात्र या प्रभागातील मोठा भाग अजूनही मूलभूत सुविधापांसून वंचित आहे. त्यामुळे या प्रभागातील नाल्या व रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.प्रभागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांचा अभाव आहे. जुन्या नाल्या जीर्ण झालेल्या आहेत. या संपूर्ण परिसरातील जमीन उंच व सखल असल्यामुळे नाल्याना योग्य उतार व आउटलेट नाही. परिणामी नाल्यांमध्ये पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड असून या भूखंडामध्ये वर्षभर सांडपाणी साचून राहते. सांडपाण्याची घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.घाणीमुळे डुकरांचा हैदोस वाढला असून प्रभागातील आंबेडकर भवन सभागृह, वडगाव, साईनगर, नागरकर ले-आऊट, गजानन महाराज मंदिर, स्नेह नगर, दत्तनगर, लक्ष्मीनगर, विवेकानंद नगर, नानाजी नगर, हवेली गार्डन, साईबाबा मंदिर, अर्थव कॉलनी, ओम भवन परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे. येथे दरवर्षी पावसाळ्यात बॅक वाटरमुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होते.त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात प्रहारच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन वडगाव प्रभागाच्या विकासाकरिता विशेष निधी देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यानी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रहारचे फिरोजखान पठाण, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे, मीना कोतंबवार, मनीषा बोबडे, अक्षय येरगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.