शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नरेश पुगलियांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: September 2, 2014 23:37 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याचे त्यांनी केलेले विधान स्वत:ची निष्क्रियता आणि निर्णयक्षमता लपविण्यासाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाला युपीए-२ सरकारची वाईट प्रतिमा आणि राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलिकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी पक्षाने त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे तोल सुटल्याने आपल्या मर्यांदांचे भान विसरून त्यांनी खुद्द पक्ष नेतृत्वावरच असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल केलेले नकारात्मक वक्तव्य पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असून पक्षकार्यकर्त्यांच्या आदराला धक्का पोहचविणारी आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री या नात्याने ते अकार्यक्षम राहीले आहेत. अलिकडे दिसणारी कार्यक्षमता गेल्या दोन वर्षात दिसली असती तर पक्षाला फायदा झाला असता. मात्र आपल्या निष्क्रियतेचे खापर राहूल गांधींच्या माथी फोडण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्याच्या या अस्वस्थेमागे बरीच कारणे असल्याचे सांगून ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवारांना तिकीटा देण्याऐवजी स्वमर्जीतील व्यक्तींना तिकीटा दिल्याने पराभव पहावा लागला. ही जबाबदारी त्यांची असताना नेतृत्वावर आरोप कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)