शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात शीतपेयाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:41 IST

उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.

ठळक मुद्देमिळाला हंगामी रोजगार : शहरातील प्रमुख मार्गावर हातठेले

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती): उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.अलिकडे सूर्य आग ओकायला लागला आहे. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. साहजिकच यापासून थंडावा लाभावा, यासाठी उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे व शितपेय पिण्याकडे सर्वाधिक कल दिसून येत आहे. नागरिकांची पसंती लक्षात घेऊन चतूर दुकानदार विविध कंपन्यांचे आईस्क्रीम, ज्युस, लस्सी, कुल्फी, चोकोबार तथा शितपेयाची दुकाने मोठया प्रमाणात थाटतात. ऊसाच्या ताज्या रसाची रसवंतीची व लिंबू शरबताच्या गाड्याही मोठया प्रमाणावर लावल्या जातात. शहरात खाद्यपदार्थांच्या दुकानांप्रमाणेच आईस्क्रीम पार्लरची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. आईस्क्रीमनंतर लस्सी व चोकोबारला बच्चे कंपनी जास्त पसंती देत असल्याचे दिसून येते. अमुक कंपनीचेच आईस्क्रीम ग्राहकांपर्यंत जावे, यासाठी नामांकित कंपन्या आईस्क्रीम विक्रेत्यांना विशेष पॅकेज देत आहेत. या पॅकेजमध्ये डिप फ्रीज, दुकानाला लागणारे फर्निचर आदी सोयीसवलतींचा अंतर्भाव असल्याचे सांगितले जाते. वीजदर वाढल्याने मागील दोन तीन वर्षांपासून आईस्क्रीम व्यवसाय डबघाईस आला आहे. सध्या बाजारात दहा रुपयांपासून शंभर सव्वाशे रुपये पर्यंत किमतीचे आईस्क्रीम बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध आहे. तप्त उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला पायनापल ज्युस, लस्सी, उसाचा रस, लिंबू शरबताची दुकाने मोठया प्रमाणात थाटली आहे. या हंगामी दुकानात थंड पदार्थ थोडे स्वस्त भावाने मिळत असल्याने ग्राहकांचा कल या दुकानांकडेही आहे. विद्युत बिलांमुळे हा व्यवसाय काहीप्रमाणात आर्थिक कोंडीत सापडला. शहरात उन्हाळ्याव्यतिरिक्त बाराही महिने आईस्क्रीम खाणारा वर्ग असल्याचे शहरात दिसून येते.वीज दरवाढीचा फटकाअनेक कुटुंबात जेवण केल्यानंतर अथवा कौटुंबिक उत्सवप्रसंगी स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम खाण्याची पध्दत रूढ झाली आहे. मात्र दीर्घकाळ विद्युत पुरवठा खंडित असल्यास या व्यवसायात नुकसान होत असते. वीजदरवाढ होत राहिल्यास आगामी हा व्यवसाय गुंडाळल्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती एका विके्रत्याने ‘लोकमत’ शी बोलताना दिली. या व्यवसायात अनेकदा आर्थिक नुकसान होते. पण हंगामी रोजगारासाठी हा व्यवसाय चांगला पर्याय आहे, असेही त्यांनी सांगितले.