शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

‘त्या’ घटनेने दीपकचे आयुष्यच काळवंडले!

By admin | Updated: February 12, 2015 00:52 IST

१० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला.

लोकमत मदतीचा हातनंदोरी : १० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला. आणि दीपकचा डावा पाय गुडघापासून अक्षरश: तुटून पडला. अचानक आलेल्या या अपंगत्वाने त्याचे अख्खे आयुष्यच काळवंडले. पुढे भविष्य तरी चांगले व्हावे यासाठी तो संघर्ष करीत आहे. त्याला कुबडीचा नाही तर शासनाचा भक्कम आधार हवा आहे. दीपक नगराळे याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई मंदाबाई मजुरी करायची. मातंग समाजाचे हे कुटुंब. वडील रामाजी नगराळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने उर फुटेपर्यंत, अगदी थकून जाईपर्यंत डफ बडवायचे आणि दिवसाकाठी कसेतरी २० ते २५ रुपये मिळवायचे. दीपकच्या अपघाताने वडील रामाजी नगराळे पूर्णत: खचले. मानसिक आघाताने आणि आजाराने खचलेल्या आई मंदाबाईला काम करण्याचे शरिरात त्राण उरले नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. आज दीपक १८ वर्षाचा झाला. नियतीच्या खेळाने व गरिबीच्या परिस्थितीने दीपकला इयत्ता नववीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. असलेली पुंजीही दीपकच्या उपचारात खर्ची झाली. पायाने अपंग असलेल्या दीपकला कोणी काम देईना. आजही दीपक कागदपत्रांची पिशवी घेऊन आणि आपल्या कुबडीचा आधार घेऊन शासनदरबारी उंबरठे झिजवतोय. त्याला मदतीचा हात हवा आहे.दीपकला कृत्रिम पाय बसवायचा आहे. त्याला पायाला सर्जरी करायची आहे. जवळ भांडवल नाही, सरकारी मदत मिळत नाही. त्याला उदरनिर्वाहाकरिता एखादी लहानशी नोकरी किंवा रोजगाराचे साधन मिळावे, अशी इच्छा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दीपकला पाच वर्षांपूर्वी एका शिबिरात कृृत्रिम पाय बसविण्यात आला होता. त्याचे आठ दिवसातच खिळे तुटून तो पुर्णपणे विस्कळीत झाला. यातही दीपकची फसवणूकच झाली.दीपक रोजगार सेवक म्हणून नियुक्त आहे. परंतु हाताला काम नाही. (वार्ताहर)