वरोरा
: गांधी उद्यान योग मंडळ व गुढीपाडवा आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील आंबेडकर चौकात एका कार्यक्रमात माजी नगरसेवक खेमराज कुरेकार यांच्याहस्ते पूजन करून स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी येथील व्यावसायिक ग्यानचंद मालू, योगगुरू प्रकाश संचेती व शालिक बदखल उपस्थित होते.
गांधी उद्यान योग मंडळातर्फे तीन स्टीलच्या तिरड्या व चार ऑक्सिजन सिलिंडर शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर करताच चेतन चंदन शर्मा यांनी दोन तिरड्यांसाठी ११ हजार रुपये, तर विजय गोटे यांनी ऑक्सिजनच्या एका सिलिंडरसाठी निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे चंदन शर्मा, विजय गोटे तसेच शहरातील तरुणांना मोफत सैनिकी प्रशिक्षण देत असलेल्या माजी सैनिक सागर गणपत कोसळू या मान्यवरांचा मंडळातर्फे शाल, श्रीफळ व मंडळाचे टी-शर्ट देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे मावळते अध्यक्ष खेमराज कुरेकार यांनी नवनियुक्त अध्यक्ष नीतेश जयस्वाल यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली व त्याचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी नरेंद्र नेमाडे, आनंद गुंडावार, मनोज कोहळे, जयंत मारोडकर, प्रमोद नांदे व गांधी उद्यान योग मंडळाच्या समस्त सभासदांचे सहकार्य लाभले.