शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:12 IST

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाले. एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. गुरुवार २३ मे रोजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या पटांगणात मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कुणाच्या विजयाचा होणार जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाले. एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. गुरुवार २३ मे रोजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या पटांगणात मतमोजणी होणार आहे.सदर मतमोजणी विधानसभानिहाय होणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम निकाल हाती येण्यासाठी कमीत कमी १२ तासांचा अवधी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या मतमोजणीसाठी एकूण ३२८ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २५ ते ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. एक फेरी ३० ते ४० मिनिटांची असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने बुधवारी चंद्रपुरातील गल्लीबोळात निकालाबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. राजकारण, निवडणूक, निकाल हेच आज चर्चेचे विषय होते. चंद्रपूरचा खासदार कोण असेल, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता लागून आहे. त्यामुळे निकालाच्या प्रत्येक फेरीकडे मतदारांचे लक्ष असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९