शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांना सरंक्षण देण्याचा निर्णय कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:49 IST

झोपड्यांना अधिकृतरीत्या संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ नंतरच्या जिल्ह्यातील हजारो झोपडीधारकांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, चार वर्षे पूर्ण होऊनही सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोष : मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : झोपड्यांना अधिकृतरीत्या संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ नंतरच्या जिल्ह्यातील हजारो झोपडीधारकांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, चार वर्षे पूर्ण होऊनही सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.झोपडपट्टीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने १९७१ रोजी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुर्नविकास) अधिनियम तयार केला. ३ आॅगस्ट १९७१ रोजी या अधिनियमनाला राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाली. झोपडपट्ट्यांची सुधारणा, निर्मूलन व पुर्नविकासासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या. याच अधिनियमाखाली चंद्रपूर शहराकरिता झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे प्रशासनाने जाहीर केले. जमिनधारक व भोगवटादारांनी विकासकर्त्यांमार्फत पुर्नविकास योजनेची यात तरतूद आहे. परंतु संबंधित क्षेत्रांचे जमीनधारक किंवा भोगवटादार या योजनेत सहभागी होत नसतील तरच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला अशा पुनर्वसनाच्या विकासाची कामे हाती घेता यतात. जोपर्यंत शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे असे झोपडपट्टी क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित होत नाही, तोपर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रकल्प कार्यान्वित होण्याची कार्यवाही होत नाही. अशा राजपत्रातील घोषित झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र व झोपडपट्टी निर्मूलन आदेशाने बाधित झालेल्या कोणालाही या आदेशाविरुद्ध विशेष न्यायाधिकरणाकडे अपील सादर करून दाद मागण्याची तरतूद आहे. परंतु लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.समस्यांमुळे नागरिक हतबलशहरातील झोपडीधारकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. झपाट्याने शहरीकरण होत आहे. यातून निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य विकास धोरण व कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. झोपडपट्टीवासीयांसाठी राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम व वाल्मिकी,रमाई आवास योजनाही थंडबस्त्यात आहे.केंद्रीय योजनांचा पत्ता नाहीकेंद्र शासनाने राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान योजना जाहीर केली होती. अभियान अंतर्गत शहरी भागातील झोपडीधारकांसाठी मूलभूत सेवासुविधा पुरविणे व पुनर्वसन उपकार्यक्रम, महानगरपालिका व नगर परिषदांच्या क्षेत्रात राबविण्यात येत होता. परंतु नियोजनाअभावी ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.