शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

By admin | Updated: June 8, 2016 00:46 IST

प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते.

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : वनविभागातर्फे पर्यावरण दिनचंद्रपूर : प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते. जास्तीत जास्त वृक्ष लावून दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची गरज असल्याचे मत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभागातर्फे रविवारी आयोजित पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाघांचे साम्राज्य’ या घडीपुस्तिकेचे विमोचन व वृक्षारोपन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. मंगेश गुलवाडे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.१ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या पेक्षा जास्त वृक्ष लावून महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले असेल. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लावताना नकारात्मक भूमिका मनात न ठेवता सकारात्मक भूमीका घेऊन वृक्ष जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमामध्ये वनविभाग, नवमानव बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना व चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती यांच्या वतीने वनविभाग कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. नवमानव संस्थेचे संस्थापक प्रवीन डाहुले, स्वाती लांडे, संजय खोब्रागडे, रामचंद्र शेंडे, महेश मानकर, आशीस हिवरे, संजय भंडारी व प्रफुल मेश्राम या रक्तदात्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोपाल मुंदडा यांनी केले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)