शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन ओडिसीची झाली मद्यासाठी तपासणी

By admin | Updated: May 13, 2016 00:59 IST

विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा तपासणी झाली.

मद्य आढळलेच नाही : मात्र पर्यटकांना मनस्तापचंद्रपूर : विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा तपासणी झाली. मात्र मद्य तर आढळलेच नाही, उलट भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचा खेदजनक प्रकार बुधवारी चंद्रपुरात घडला. या रेल्वेमध्ये मद्य आणले असून त्याचा वापर पर्यटकांकडून होत असल्याच्या तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रेल्वे पोलिसांनी ही तपासणी केली होती, हे विशेष ! बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही डेक्कन ओडीसी पंचतारांकित रेल्वे चंद्रपूरच्या रेल्वे फलाटावर लागली. त्यानंतर सकाळी पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वनभ्रमंतीसाठी निघून गेले. दरम्यान, ही पंचतारांकित रेल्वे चंद्रपुरात पोहचल्याची बातमी कर्णोपकर्णी झाली. या रेल्वेमध्ये मद्य आणि बिअर बार असून त्याचा वापर होत असल्याच्या बातम्याही शहरात पसरल्या. दरम्यान, शहरातील दारूबंदी विरोधकांच्या पुढाऱ्यांनी काही समर्थकांसह रेल्वे स्टेशनवर येवून माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ प्रतिक्रिया देणे सुरू केले. सोशल मिडीयावरूनही ही माहिती फिरल्याने यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येत राहील्या. दरम्यानच्या काळात या पंचतारांकित रेल्वेतून मद्य चंद्रपुरात आल्याने दारूबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीही पोलिसात केल्या. त्यामुळे दिवसभर बराच गोंधळ उडाला होता. तक्रारकर्त्यांच्या वाढत्या आग्रह लक्षात घेता पोलिसात झालेली तक्रार रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली. अखेर धावपळ करीत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची चमू रेल्व स्थानकावर पोहचली. त्यांनी रेकॉर्डची तपासणी केली. रेल्वे पोलिसांनीही या रेल्वेची आणि रेकॉर्डची पाहणी केली. मात्र या तपासणीमध्ये मद्य अथवा आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही. या तपासणीनंतर ही रेल्वे पुढच्या प्रवासाठी रवाना झाली. या प्रकारामुळे पर्यटकांना मनस्ताप मात्र सहन करावा लागला. काय सुरु आहे, हे कळल्यावर पर्यटकांनी या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, पर्यटकांपैकी एकाने पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई आयुक्त कार्यालयात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आयुक्तांशी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची चर्चा करवून दिली. एकीकडे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना दारूबंदी उल्लंघनाच्या नावाखाली देशीविदेशी पर्यटकांना झालेला मनस्ताप आणि दारूबंदी विरोधकांचा तसेच माध्यमांचा उथळपणा चर्चेचा ठरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)