शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: July 8, 2016 00:52 IST

येथील बँकेतून श्रावणबाळ योजनेचे पैसे काढून घरी परत येत असताना अचानक मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला.

मूल : येथील बँकेतून श्रावणबाळ योजनेचे पैसे काढून घरी परत येत असताना अचानक मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला. विस्तारीबाई शंकर बोडुवार (७०) असे मृत महिलेचे नाव असून ती मूल येथील वॉर्ड क्रमांक १७ मधील रहिवासी आहे. सदर घटना आज गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावर घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला तिला मिळणाऱ्या श्रावणबाळ योजनेच्या लाभाचे पैसे बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेतून काढून घरी परत येत होती. नागपूर रोडवरील गोयल यांच्या दुकाना जवळ आली असताना या दुकानात ट्रकमधून (क्र. एमएच- ४० -७७५१) टिनाचे पत्रे उतरविल्यानंतर गांधी चौकाकडे जाण्याकरिता ट्रकचालक मधुकर सावली लांजेकर याने ट्रक सुरु केला. ट्रक सुरु करुन पुढे येत असताना विस्तारीबाईला ट्रकची धडक बसली. धडकेमुळे ती रोडवर कोसळली. सदर बाब ट्रक चालकाच्या लक्षात येण्यापूर्वी ट्रकच्या मागच्या चाकात महिलेचे दोन्ही पाय आणि कंबर आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी ट्रकचालक मधुकर सावली लांजेकर (४१) रा. चितेगाव याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम २७९ आणि ३०४ भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)