राजेश भोजेकर,चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा कोळसा खान परिसरात एक्सप्रेस कंपनीतील मेक्यानिकल कामगाराचा मृतदेह ट्रकच्या सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दि. 19 रोजी आढळला. आत्महत्या की हत्या असा पेच भद्रावती पोलीसांना समोर पडला आहे.
संजय मोचीराम नायक (२६) असे मृतक व्यक्तीचे नाव असून तो ओरिसा राज्यातील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक हा एम्टा कोळसा खान प्रकल्पातील कार्यरत असलेल्या एक्सप्रेस कंपनीत मेकॅनिकल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची आत्महत्या कि हत्या या दिशेने पोलीसांचा तपास सुरु आहे कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी मृतकाच्या ओरिसा येथील नातेवाईकांना माहिती दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.