शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घेऊन डीनला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:06 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देरुग्णालयात तणाव : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर महिलेचा मृतदेह ठेऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला घेराव घातला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर एक तासाने मृतदेह उचलण्यात आला. मथुरा जावरे यांना पोटात दुखत असल्यामुळे त्या २५ सप्टेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाल्या. ५ आॅक्टोबरला शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातून गोळा काढण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांच्या जखमेतून सतत पाणी निघत होते. तसेच पोटात दुखतसुद्धा होते. याबाबत मथुराच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना माहिती दिली. मात्र त्यांनी कोणताहा उपचार केला नाही. दरम्यान मंगळवारी रात्री त्यांना डॉक्टरांनी रुग्णाला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी मथुराला नागपूर येथे हलविले. मात्र तिची प्रकृती अतिशय नाजुक होती.दरम्यान, काही वेळातच नागपूर येथे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तसेच युवासेनेचे संदीप गिºहे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला. त्यानंतर अधिष्ठाता एस.एस. मोरे यांना घेराव घालून संबंधित डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. एस. भगत यांना पाचारण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांनी प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.डॉक्टरांनी उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी केली नाही. तरी सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. या अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.-एस. एस. मोरे, अधिष्ठाताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर