शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह तीन तास ग्रामपंचायतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:46 IST

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ग्रा. पं.च्या रोजंदारी मजुराचा पथदिवे लावताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देकरंजीतील घटना : ग्रा.पं.च्या रोजंदारी मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ग्रा. पं.च्या रोजंदारी मजुराचा पथदिवे लावताना विद्युत शॉकने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शुक्रवारी घडली.दीपक परशुराम गोहने (२३) रा. करंजी असे मृत मजुराचे नाव आहे. ग्रामपंचायत अंतर्गत विद्युत खांबावर पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. दीपक गोहने हा ग्रामपंचायतीमध्ये हंगामी मजूर म्हणून मागील वर्षभरापासून काम करीत होता. शुक्रवारी दीपक काही सहकाºयांसोबत खांबावर पथदिवे लावण्यासाठी गेला. मात्र विद्युत प्रवाह पूर्णपणे बंद झाला नव्हता. करंजी बसस्थानकावरील सुधाकर वाढई यांच्या घरासमोरील खांबावर दीपक चढला. विद्युत प्रवाह सुरु असल्यामुळे विद्युत शॉक लागल्याने दीपक खांबावरून खाली कोसळला. सोबतीला असलेल्या सहकाºयांनी दीपकला लगेच गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दीपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची वार्ता क्षणार्धात करंजी गावात धडकली. यानंतर संपूर्ण गावकरी रुग्णालयात धडकले. सरपंच ज्योती चिचघरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी रुग्णालयात हजर होते. घरातील कमावता मुलगा मृत पावल्याने कुटुंबीयांनी मदतीची मागणी रेटून धरली. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सरपंच व पदाधिकाºयांच्या सहमतीने दहा हजार रुपये दिले.त्यानंतर प्रेत कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याचवेळी कुटुंबीयांनी तीन लाखांची मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांत एकमत न झाल्यामुळे या मागणीवर कुणीही काही बोलू शकले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शवविच्छेदनानंतर घरी नेलेला मृतदेह पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात आणला. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सर्व पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.तीन तासानंतर तोडगामृतदेह ग्रामपंचायतीत आणल्यानंतर ग्रामसेवक व पदाधिकाºयांमध्ये एकच तारांबळ उडाली. तीन तास मृतदेह तिथेच होता. पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांची कार्यालयात बैठक झाली. तब्बल तीन तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर ठाणेदारांच्या मध्यस्थीने अखेर मार्ग निघाला. ग्रामपंचायतीने स्टॅम्प पेपरवर तीन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे लिहून दिल्यानंतर गोहने कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.ग्रा.पं.कडे निधीच नाहीग्रामपंचायती प्रशासनाने सर्वांच्या सहमतीने मृताच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र तुर्तास ग्रामपंचायतीकडेच निधी नसल्याने स्टँम्प पेपरवर लिहून द्यावे लागले.