शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वहाणगावच्या उपसरपंचावरील जिल्हाबंदी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:13 IST

तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देदारूबंदी प्रकरण : गावकºयांचे जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला. २३ आॅक्टोबरला ग्रामसभेची अंमलबजावणी करून आंदोलन केले होते. या आंदोलनाने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे दारूबंदी आंदोलनातील प्रमुख वहाणगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे यांना प्रशासनाने जिल्हाबंदी केली व गावातील ७० नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते.प्रशासनाने जनतेवर अन्याय केला आहे. प्रशांत कोल्हे यांच्यावरील जिल्हाबंदी हटवा व गावकºयांवर लावलेले गुन्हे रद्द करा, असे निवेदन गावकºयांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना उपविभागीय अधिकाºयांमार्फत पाठविले आहे. अवैध दारूविक्री कंटाळून गावकºयांनी २ सप्टेंबरला ग्रामसभा घेवून अवैद्य दारूविक्री बंद करा अथवा ग्रामपंचायतीला दारू विक्रीची परवानगी द्या, असा ठराव पारीत करण्यात आला होता.ग्रामसभेची अंमलबजावणी म्हणून २३ आॅक्टोबरला शासनाला जाग आणण्याच्या दृष्टीकोनातून गावात देशी-विदेशी दारूचा फलक लावून नागरिकांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान व्हिडीओ चित्रीकरणात असणाºया ७० महिला, पुरूषांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे. प्रशासनाने गावकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून उलट उपसरपंच प्रशांत कोल्हे यांच्यावर जिल्हाबंदी करून गावकºयांवर गुन्हा नोंद केला आहे. कोल्हे यांच्यावरील जिल्हाबंदी हटवावी व दारूबंदी गावकºयांवर दाखल केलेले गुन्हे ८ दिवसात रद्द करण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. शिष्टमंडळात बंडू भोयर, गजानन कोल्हे, बबन जांभुळे, चंद्रभान खोंड, अरविंद थुटे, गजानन गायकवाड, सुधाकर दडमल, विलास गोठे, शंकर नन्नावरे आदी गावकरी उपस्थित होते.ग्रामसभा ठरावाचा कायदा प्रशासनाने मोडलाग्रामसभा ही सार्वभौम ग्राम असून घटना क्रमांक ७३ नुसार कायदा २४३ (ब) नुसार सत्ता लोकांच्या हातात असते. मात्र प्रशासनाने ग्रामसभेच्या ठरावाचा कायदा मोडून ग्रामसभेचे निरपराध अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्यावर जिल्हाबंदी व गावकºयांवर गुन्हे नोंदवून गावकºयांवर अन्याय केला आहे.