शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी मिळाले वीजमिटर

By admin | Updated: August 4, 2016 00:48 IST

स्मार्ट फोनच्या आजच्या युगात महावितरणही स्मार्ट झाले आहे.

ग्राहकाला दिलासा : वरोरा उपविभागाची कार्यवाहीवरोरा : स्मार्ट फोनच्या आजच्या युगात महावितरणही स्मार्ट झाले आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून महावितरण कंपनीने ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू केले आहे. वरोरा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खांबाडा येथील तलाठी कार्यालयाने विद्युत मिटरकरिता अर्ज केला, त्याच दिवशी सर्व सोपस्कार पूर्ण करीत तत्काळ विद्युत मिटर लावून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी विद्युत मिटर देवून वीज पुरवठा सुरू करणारे वरोरा पहिलेच उपविभाग ठरल्याचे मानले जात आहे.महावितरण कंपनीकडे विद्युत मिटर घेण्याकरिता सर्व कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. त्यानंतर वीज कर्मचारी मोजमाप व शहानिशा करण्याकरिता नविन वीज घेणाऱ्या ग्राहकाकडे जातात. त्यानंतर अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची आॅनलाईन नोंदणी करून डिमांड ग्राहकाला दिले जाते. डिमांड ग्राहकाने अदा केल्यानंतर काही दिवसांनी विद्युत मिटर दिले जाते. यामध्ये ग्राहकांना वेळोवेळी वीज वितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागते. याकरिता महावितरण कंपनीने नुकतेच ग्राहकांना कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता मोबाईल अ‍ॅप्स विकसीत करून कार्यान्वित केले आहे. याच माध्यमातून वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील तलाठी कार्यालयात विद्युत पुरवठा व नवीन विद्युत मिटर लावण्याकरिता खांबाडा वीज वितरण केंद्रातून वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला अर्ज प्राप्त झाला. मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी अर्ज प्राप्त झाल्याच्या अवघ्या काही तासातच अर्जाचे पूर्ण सोपस्कार पूर्ण करीत खांबाडा येथील तलाठी कार्यालयात विद्युत मिटर लावून, त्याच दिवशी विद्युत पुरवठा सुरू केला. यावेळी वरोरा महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. जी. नगराळे, उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर, खांबाडा येथील अभियंता रावत, खांबाडा मंडळ अधिकारी ठवरे, तलाठी कोंटागले व वीज कर्मचारी उपस्थित होते. महावितरणने राज्यात मोबाईल अ‍ॅप विकसीत केल्यानंतर ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी वीज पुरवठा करणारे वरोरा उपविभाग पहिले ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)