शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यक्रमातून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

By admin | Updated: May 13, 2016 01:10 IST

आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी- नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी, ...

सखीज् गॉट टॅलेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद : कलर्स आणि लोकमत सखी मंचचा उपक्रमचंद्रपूर : आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी- नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी, बॉलिवूड अशा विविध अस्मितेचे प्रतिनिधीत्व करीत सज्ज असलेल्या सख्या, जोशपूर्ण नृत्य, तालासुरात, मंजूळ आवाजात सादर होणारी गाणी, सासू-सुनेचे संबंध, पाणीप्रश्न अशा विविध विषयांसह सादर झालेले अभिनय, सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलूट या उत्साही वातावरणात महिलांनी मेजवानीचा आनंद घेतला. निमित्त होते कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच आयोजित ‘सखीज गॉट टॅलेंट’ कार्यक्रमाचे. आयएमए हॉल गंजवार्ड चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत सखी आपल्या कुटूंबासह सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या अ‍ॅड. संध्या मुसळे तसेच लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. यावेळी सहभागी सखींनी गायन, वादन, नृत्य सादर करून आपल्या प्रतिमेची चुनूक दाखवली.स्त्रियांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जसे लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या मनात रूजले आहे. तसेच कलर्स चॅनलनेदेखील कौटुंबिक मालिका आणि इतरही कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वतंत्र पकड निर्माण केली आहे. कलर्स चॅनलवर ३० एप्रिलपासून इंडियाज गॉट टॅलेंट दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केले जाते. कलर्स चॅनलने पुन्हा एकदा कलाकारांच्या अंगभुत केलेल्या प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच कलाकारांना उपलब्ध करून दिला आहे.‘सिर्फ हुनर ही है पहचान’ याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर, प्रसिद्ध निर्देशक करण जोहर, नृत्य निपून मलाईका अरोरा यांच्या अनुभवी परिक्षणातून सर्व कलाकार तावून सलाखून बाहेर निघणार आहेत.आयएमए हॉल चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सारेगमपा फेम समृद्धी इंगळे हिने आपल्या सुरेल आवाजात सिनेगीत सादर केले तर श्रुती नगराळे आणि इमरान यांच्या जोडीने नृत्याविष्कार सादर करून धमाल उडवून दिली. परीक्षण संगीत विशारद किशोर तळवेकर आणि नृत्य प्रशिक्षक सागर अंदनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)